share market चा प्राचीन इतिहास - Mazi Naukri Portal

Government jobs, sarkari naukri, mazi naukri portal, jobs, naukri, Marathi News,

Breaking

Home Top Ad

९/०३/२०२०

share market चा प्राचीन इतिहास

Share market ही संकल्पना म्हणावी तेवढी पण आधुनिक नाही, आज आपण share च्या खरेदी विक्रीसाठी कितीतरी Brokers पाहतो, account opening fees देतो, brokerage charges देतो, पण आज पासून जवळजवळ 100-200 वर्षांपूर्वी अशी काही गुंतवणूक पद्धती होती का की ज्याद्वारे त्या काळातील लोक आपले पैसे एखाद्या विशिष्ट व्यवसायात गुंतवू शकतील, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.


मित्रांनो सुरुवातीच्या काळात युरोपिअन प्रवासी आपला व्यापार वाढवण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करायचे, आणि अधिकाधिक नफा मिळवायचे. आपल्या छोट्याशा व्यापारातून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी त्यांना बलाढ्य आशा समुद्रास ओलांडून दुसऱ्या देशात जावे लागत असे. आणि अशा घातक प्रवासात त्यांना समुद्री लुटेरे, वादळ अशा अनेक घटनांना सामोरे जावे लागत असे. आणि अशा वेळेस व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागत असे. कधी कधी तर संपूर्ण जहाजच बुडाल्याने त्या जहाजाच्या मालकाचे मोठे नुकसान होत असे, आणि या सर्वांवर पर्याय म्हणून युरोपियन लोकांनी एक पर्याय निवडला ज्याद्वारे असे सांगण्यात आले की व्यापाऱ्या व्यतिरिक्त शहरात राहणारी अनेक लोक आप-आपला पैसा ठराविक जहाजावर लावू शकत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा